Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यात दिनांक 1 सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाची सर्वात जास्त नोंद सिंदगी, इस्लापूर, उमरी मंडळात झाली असून सिंदगी मंडळात 178 मि.मि. इस्लापूर 165 मि ,मि. उमरी 160 मि.मि. मांडवा 153 मि.मि.जलधरा 138 मि.मि, किनवट 140 मि.मि दहेली 112 मि.मि. बोधडी 81मि.मि इतका पाऊस या नऊ मंडळामध्ये एका दिवसात पडल्याने शेतीची व पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन पोळा सणाच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीचे सावट आल्याने बळीराजा हवालदिल झाला. शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई तात्काळ प्रशासनाने द्यावी व पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी नाल्यांना पूर जन्य परीस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. त्यातच पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.



किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी दोन्हीही तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ प्रशासनाच्या वतीने करण्यात यावे अशा स्वरूपाच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांना दिल्या. व ओला दुष्काळ जाहीर करण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी सुद्धा केली व पाऊस उघडताच नुकसानीच्या पंचनाम्यासाठी सुरुवात होईल अशी अधिकृत माहिती त्यांनी दिली. त्यातच येत्या काही कालावधीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्याकारणाने पैनगंगा नदीकाठच्या गावच्या लोकांनी सतर्क रहावे व बाहेर कुणीही पडू नये असे आव्हान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या वतीने करण्यात आले.


अशा ढगफुटी सदृश्य पावसामुळे इस्लापूर भागातील मुरझळा, कोल्हारी, भिशी,वाळकी, रोडानाईक तांडा, पांगरी,इस्लापूर, जलधारा, नंदगाव, नंदगाव तांडा तांडा,रिठा,शिवणी, आप्पारापेठ या भागातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत तर सोयाबीन कापूस उभी पिके आडवी पडली आहेत मात्र मुरझळा येथील बेबीताई विजय गुंडे, सुशीलाबाई दिगंबर गुंडे, विश्वंभर सखाराम गुंडे ,मारोतराव विठ्ठलराव तुपेकर, दत्ता लक्ष्मण नखाते, गणेश विठ्ठल चिकणे, साहेबराव विठ्ठल गायकवाड, बालाजी दिगांबर सूर्यवंशी, विठ्ठल दिगंबर सूर्यवंशी, या शेतकऱ्यांची पिके शेतीसह खरडून गेल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



बेबीताई विजय गुंडे या शेतकरी महिलेने दरवर्षी आपल्या शेतात नाल्याचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते हे नुकसान टाळण्यासाठी बेबीताई विजय गुंडे या शेतकरी महिलेने आपल्या पतीला सोबत घेऊन गेल्या वर्षी दोन ते तिन लाख रुपये खर्च करून नाल्याचे पाणी शेतात शिरू नये म्हणून दगडी व माती बांध टाकला होता. मात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने माळरानावरील नाल्याला आलेल्या पाण्याने हा दगडी बांध आणि माती बांध फोडून सर्व पाणी शेतात घुसल्याने शेतीसह कापूस खरडून गेला असून अक्षरशः या शेतीला नाल्याचे स्वरूप आले आहे.


या नाल्यामुळे दरवर्षी पिकांचे तर मोठे नुकसान होत होतेच त्यातच लाखो रुपये खर्च करून दगडी बांध व मातीबांध टाकला होता तोही यावर्षी पाण्याच्या प्रवाहाने खरडून गेल्याने या शेतकऱ्याचे शेतीचे मोठे नुकसान झाले असून संबंधित विभागाने खरडलेल्या शेतीसह नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्षपणे पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.



