HomeनांदेडE-counting ; नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित...

E-counting ; नांदेड जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ई-मोजणी आज्ञावली कार्यान्वित – NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यात ई-मोजणी Ver-ll आज्ञावली ही पहिल्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख अर्धापुर, दुसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख हदगाव,मुदखेड व तिसऱ्या टप्यात उप अधीक्षक भूमि अभिलेख  नांदेड, बिलोली व लोहा कार्यालयात कार्यन्वित करण्यात आली आहे . तसेच उर्वरित सर्व तालुक्यात उद्या ०१ सप्टेंबर २०२४ पासून कार्यन्वित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख व कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे.ई-मोजणी Ver-ll आज्ञावली मधे नागरिकाना घरबसल्या ऑनलाइन मोजणी अर्ज करता येतो तसेच अर्जदार यांना अंक्षास व रेखांश आधारे नकाशा पुरविण्यात येणार आहे .त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे.

सदर प्रशिक्षण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सीमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  आज नियोजन भवन नांदेड येथे घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणास हजर होते.सदर प्रशिक्षणावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकेचे निरसन बी. व्ही मस्के उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments