HomeमुंबईNSUI's awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात...

NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

मुंबई| बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय राज्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत, तसेच सह्यांची मोहिम राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

264b866a 292d 4760 979f a85e9b809c38 NSUI's awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले - NNL

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकार महिला व मुलींना संरक्षण देऊ शकत नाही. मा. उच्च न्यायालयानेही या सरकारला फटकारले आहे तरीही त्यांना जाग येत नाही. महिलांचे संरक्षण तर ते करु शकत नाहीतच उलट मुलींनी ७ वाजल्यानंतर बाहेर पडू नये असे सल्ले देत आहेत. संवेदना नसलेल्या महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना जनजागृती करुन मुलींना आश्वस्त करणार आहे, असेही पटोले म्हणाले.

ffd2b44a cd86 4530 8013 be547b283f91 NSUI's awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले - NNL

या आंदोलनाची आणि जागृती मोहिमेची माहिती एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी दिली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी,आमदार अभिजीत वंजारी, सुरभी द्विवेदी आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments