Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - महाराष्ट्र - Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL
महाराष्ट्र नांदेड August 24, 2024

Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | बदलापूर शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील व इतर मुलीं व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आरोपीला त्वरित कार्यवाही करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडी नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. 24 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मागणी केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील काँग्रेस कार्यालय आणि आयटीआय महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर या घटनेचा हाताला काळ्या रिबीन बांधून तीव्र निषेध नोंदवला. तसेच रेल्वेस्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या घटनेत न्याय मिळावा, अशी मागणी केली.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून बदलापूर शाळेतील बाललैंगिक अत्याचाराबरोबच राज्यात अंबरनाथ, नागपूर, अकोला, कोल्हापूर व लातूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चिमुकल्या मुलींसह महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे कृत्य आहे. या घटनेचा नांदेड जिल्हा महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करून सदर घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची कार्यवाही करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आयोजित केलेल्या सभेमध्ये विविध पदाधिकार्‍यांनी बदलापूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून राज्यामध्ये महिलांवरील व मुलींवरील होत असलेले अत्याचार त्वरित थांबवावेत अन्यथा वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी आंदोलन करील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी आ. मोहन हंबर्डे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, राष्ट्रवादी शरद पवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, राष्ट्रवादी शरद पवार नांदेड शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, बंडू खेडकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, गणेश तादलापूरकर, काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर, प्रा. मजरोद्दीन, बालासाब माधसवाड, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चव्हाण, श्रावन रॅपनवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, शमीम अब्दुल्ला, गंगाधर कावळे पाटील, सुभाष रायबोले, बालाजी चव्हाण, युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, माणिक देशमुख, लक्ष्मण भवरे, रत्नाकर जोंधळे, दत्ता पाटील तळणीकर, गणेश शिंदे, मारोती चिवळीकर, अरविंद महाराज मोरे, गजानन चव्हाण, देवराव टिपरसे, अ‍ॅड. सुरेद्र घोडजकर, मीनाताई पेठवडजकर, फैजल सिद्दिकी, बालासाहेब रावणगावकर, बालाजी गाढे पाटील, बापुसाहेब पाटील, व्ही.जे. वरवंटकर, संजय शर्मा, कुमार कुर्तडीकर, शफी रहिमान, मुन्ना अब्बास, स. दीपकसिंघ, गजानन यादव, पप्पू शर्मा, रंगनाथ भुजबळ, सत्यपाल सावंत, संजय वाघमारे यांच्यासह अनेकजणांची उपस्थिती होती.

राज्यात कायद्याचा धाक उरला नाही-भगवानराव पाटील आलेगावकर
बदलापूर येथे मुलीवर झालेला अत्याचार ही घटना मन सुन्न करणारी आहे. राज्यामध्ये कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत काय? गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी, लोकशाही व संविधान सक्षम करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी मत व्यक्त केले.

घटनेचा निषेध-आ. मोहन हंबर्डे
महिला व मुलींवर होत असलेले अत्याचार ही बाब निंदणीय आहे. या घटनेचा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करते, असे आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी म्हटले आहे.आरोपीला अटक करा-डॉ. सुनील कदम बदलापूर घटनेमध्ये आरोपींना त्वरित अटक करून कार्यवाही करावी, अशा घटना घडणार नाहीत यासाठी सरकारने पावले उचलावीत असे शरद पवार राष्ट्रवादीचे नांदेड शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी म्हटले आहे.

मुली-महिलांवर अत्याचार वाढले-माधव पावडे
महाराष्ट्र राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार वाढले आहेत. बदलापूर घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो आहे. या घटनेत आरोपीला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी म्हटले आहे.

Badlapur school sexual assault incident protested by Mahavikas Aghadi in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article09 accused gambling in City Symphony Hotel : सिटी सिन्फनी हॉटेलमध्ये जुगार खेळणारे 09 आरोपी विरुध्द कार्यवाही 1 लक्ष 14 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL
Next Article Tirthadarshan Yojana camp ; ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीराची नांदेड येथे मोठ्या थाटात सुरूवात! – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

July 13, 2024

Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

December 29, 2024

Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

August 22, 2024

सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

August 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Krida ; अक्षरा मोरेचे क्रीड़ा महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय,राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड – NNL

Jijau Brigade ; सांगलीच्या जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनास 40 महिला पदाधिकारी उपस्थित.. – NNL

online system ; यंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने

Police department ; सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर; नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन -NNL

Rupali Kadam awarded : महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?