HomeकरियरDistribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप...

Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

नांदेड| येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम कुंटूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी कै. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त कर्मशाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत दिव्यांगांना विविध व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येवून दिव्यांगांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणवेश व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमेश मस्के यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी खंडागळे, वाडेकर,बिजमवार, पेंडलवार, गोदगे,कलीम, इरफान अली, सौ. भुरेवार, श्रीमती वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुणे व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments