धार्मिकनांदेड

शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

नांदेड| आपल्या रसाळ वाणीने शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून लाखो भाविकांना मंत्रमूग्ध करणारे विश्वविख्यात कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी भव्यदिव्य आणि शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दि. 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळात शिवमहापुराण कथा वाचन होणार आहे. या महाकथेचा लाभ घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत सावकार पातेवार यांनी दिली.

सभास्थळी 50 बाय 100 फूटाचे विशाल शाही व्यासपीठ उभारण्यात येत आहे. भाविकांना कथेचा लाभ घेण्यासाठी 375 बाय 800 फूटाच्या जागेत तीन भव्य सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना पिण्याचे पाणी, पंखे, कुलर आदींसह पार्कीगचीही व्यवस्था केली उपलब्ध राहणार आहे. भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी संयोजन समितीच्यावतीने घेतली जात आहे. सभास्थळी दररोज 5 हजार स्वयंसेवक व्यवस्थेसाठी तैनात राहतील. बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी स्नानादीसह विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे.कथेनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा आपल्या मधूर व रसाळ वाणीतून शिवमहापुराण कथा वाचन करताना उपस्थित भाविक तल्लीन व मंत्रमुग्ध होतात. देशविदेशात त्यांचे लाखो अनुयायी असून सुमारे 156 देशात पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा प्रसारित होते. या महाकथेच्या यशस्वीतेसाठी गेल्या महिनाभरापासून संयोजन समिती प्रयत्नशील असून नांदेडकरांना या प्रसिद्ध कथेचा लाभ मिळणार असल्याने भाविकांत प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भाविकांनी मोठ्या संख्येने शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रवीण पोकर्णा,संजय पाटील कराळे,भारत वानखेडे,शंकरराव जाधव,केदार चिद्रावार, रवी कोटलवार,सुशील सावकार कोलवार यांच्यासह संयोज समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!