Homeनांदेड24-hour hospital shutdown : डॉक्टरांच्या देशव्यापी बंद मध्ये लोहयात २४ तास रुग्णालयात...

24-hour hospital shutdown : डॉक्टरांच्या देशव्यापी बंद मध्ये लोहयात २४ तास रुग्णालयात ठप्प -NNL

लोहा| कोलकाता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या क्रूर व अमानुष कृत्य व हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरानी देशव्यापी बंद पुकारला आहे. त्यात लोहा शहर व तालुक्यातील रुग्णालय उघडणार नाहीत लोहा तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक भारती सचिव डॉ सुनिल ब्याळे यांनी माहिती दिली. या बंदला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशन यांनीं पाठींबा दिला आहे.

कोलकता येथील महिला डॉक्टरावर झालेल्या अमानुष अत्याचारा मुळे संपूर्ण समान मन सुन्न झाले आहे तसेच या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला तसेच तोडफोड करण्यात आली. या घटनेचे देशभरात तीव्र फडसाद उमटले घटनेच्या निषेधार्थ लोहा व तालुक्यातील डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी होणार आहेत शहर व अन्यत्र दवाखाने आज शनिवारी १७ ऑगस्ट शनिवारी सकाळी सहा ते १८ तारखेला रविवारी सकाळी सहा असे २४ तास रुग्णालय बंद राहणार आहेत. असे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक भारती ,सचिव डॉ सुनील ब्याळे यांनी सांगितले.

मेडिकल बंद राहणार आहेत उघडणार आहेत. या दरम्यान कोणतीही वैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.असे लोहा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे. केमिस्ट व ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शंतनू कोटगीरे व सचिव संजय मोटे पाटील यांनी।डॉक्टराच्या बंदला पाठींबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मेडिकल सुद्धा बंद राहणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments