HomeनांदेडHon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री...

Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

नांदेड| विद्यमान सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असून याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करुन सत्तेची नशा, समाजसेवेसाठी करावी असे प्रतिपादन मा. नरेश शास्त्री यांनी संवाद मेळाव्यात बोलताना केले.

दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी हॉटेल विसावा पॅलेस नांदेेड येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. सध्या देशात व राज्यात राज्यकर्ते व राजकीय पुढार्‍यांनी जाती व धर्माच्या नावाखाली आपला स्वार्थ साधून पोळी भाजून घराणेशाहीला ख़तपाणी घालत आहेत. सर्वसामन्य जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवत आहे. याला आपणच जबाबदार आहोत, कारण चुकीचे लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवत आहोत, याचा युवा पिढीने विचार करायला हवा. आपले राजकीय भविष्य काय? प्रस्थापित पुढारी म्हातारा झाला की, त्याचं पोरगं, नातू, पंणतु पुढे येतात.

सर्वसामान्य जनतेच काय? आता असं होऊ द्यायच नाय, आता सामान्य जनतेतूनच नेता निवडायचा आहे. मी नांदेड उत्तर विधानसभा 86 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवणार आहे. आपल्या पाठबळावर आणि आशीर्वादाने मी निवडून आलो आणि सभागृहात गेलो तर माझी सरकारला पहिली मागणी राहिल ती गरीब मराठा समाज बांधवाला आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. एससी, एसटी व ओबीसीचे आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी पण सभागृहात आवाज उठवेल याची मी आपल्याला ग्वाही देतो. यावेळी सभागृहात उपस्थित मान्यवर व युवा वर्ग यांच्या बहुमताने काही ठराव पास करण्यात आले.

ठराव क्र.1) मा. नरेश शास्त्री महेशश्वरराव शास्त्री युवा मंच नांदेड ची स्थापना करणे. 2) युवा मंच तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची आखणी करणे. 3) नांदेड येथे लोककवी वामनदादा कर्डक लोककलावंत कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे दुसरी आंबेडकरी जलसा परिषद आयोजित करणे. या युवा संवाद मेळाव्यासाठी शहरातील शेकडो युवक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन कामगार नेते मा. मोहनदादा लांडगे यांनी केले तर आभार मा. भाग्येश शास्त्री यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments