Himayatnagar Severe water shortage in Dr. Annabhau Sathe town during monsoon : हिमायतनगर शहतील डॉ. अण्णाभाऊ साठे नगरात भर पावसाळ्यात तिव्र पाणिटंचाई -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील वार्ड क्रः ७ मधील डॉ. अण्णाभाऊ साठे नगर मध्ये बोअर बंद पडल्याने भर पावसाळ्यात तिव्र पाणि टंचाई भासत असून, पाण्यासाठी या भागातील नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. दि.18 ऑगस्ट पर्यंत पाणि टंचाईची समस्या सोडवावी अन्यथा डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य शाखा हिमायतनगर वतीने 20 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनातून मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर यांना देण्यात आला आहे.


हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. मात्र शहरातील जनतेला स्वच्छतेसह भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे वार्ड क्र.7 मधील डॉ. अण्णाभाऊ साठे नगर भागातील नागरिकांनी नगरपंचायतीला वारंवार निवेदन देऊन देखील पाणी समस्या सोडविण्यात आली नाही. त्यामुळे डॉ. अण्णाभाऊ साठे नगर भागातील नागरिकांना येथील बोअर गेल्या अनेक महिण्यापासून बंद असल्याने पाण्यासाठी नागरीक अबाल वृध्दानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदरच्या अण्णाभाऊ साठे नगरात गोरगरीब मजूरदार वर्ग वास्तव्यास आहे. कोणाच्यायी घरी बोअर नाही त्यामुळे पाण्याच्या तिव्र टंचाईने मजूरदारांना मजूरीचे काम बुडवून पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकती करावी लागत आहे.

या भागात पाण्याची भिषण टंचाई भासत तर आहेच, परंतू नागरी सुविधा ही मिळत नाहीत. त्यामुळे जागो जागी नाल्या तुंबल्या असून, अस्वच्छता पसरून नाल्या उपसा वेळेवर होत नसल्याने परीसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा परीणाम या वॉर्डातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, डासांची उत्पत्ती वाढल्याने गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घानीचे साम्राज्य पसरलेले असतांना नगरपंचायत प्रशासन साफसफाई करीत नाही. म्हणून घरोघरी ताप, हिवताप अन्य आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.


या ठिकाणची पाणि टंचाई समस्या दिवसेंदिवस वाढत असून, साफसफाई वेळेवर होत नसल्याने नागरीकीना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासन व संबंधीत साफसफाई करणारे नगरपंचायतचे कर्मचारी यांना वेळो वेळी सुचना देवून ही ते ऐकायला तयार नाहीत. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. वार्ड क्र. (7) मधील अण्णाभाऊ साठे नगरात येत्या 18 ऑगस्ट पर्यंत पाणि टंचाई निवारण व साफसफाईची कामे नाही केल्यास डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना हिमायतनगर वतीने दिनांक 20 ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, तहसीलदार हिमायतनगर आणि नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले असून, यावर डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांच्या नेतृत्वखाली हिमायतनगर तालुकाध्यक्ष संदीप गुंडेकर, उपाध्यक्ष बालाजी बनसोडे, शहराध्यक्ष गजानन वाघमारे, सचिव अजय बनसोडे, सहसचिव विकास मनपुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बनसोडे, रुपेश पोतारे, कुणाल वाघमारे, श्याम बनसोडे, शुभम बनसोडे, परमेश्वर जळपते, नामदेव बनसोडे, तिरुमला संजय बनसोडे, सईबाई वामनराव सोळंके, मंगलबाई माधव गुंडेकर, शकुंतलाबाई प्रकाश बनसोडे, गयाबाई आनंदराव मनपुरे, सुशिलाबाई दत्त बनसोडे, सुनीताबाई संजय गुंडेकर, बेबाबाई महादू बनसोडे, कविताबाई परमेश्वर वाघमारे, गोदावरीबाई मसाजी बनसोडे, अनुराधाबाई विलास बनसोडे, आडेलाबाई कोंडीबा बनसोडे, चंचलबाई प्रवीण टेकेवाड, वंदना दिलीप बनसोडे, सावित्रीबाई भाऊराव वाघमारे, कांताबाई दत्ता बनसोडे, आदींसह शेकडो महिला पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



