HomeनांदेडYouth should do party work vigorously - Minister Aditi Tai Tatkare :...

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी गुरुवार रोजी नांदेड येथे आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या शहर जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी चैतन्य नगर परिसरातील एम. के. फंक्शन हॉल येथे युवा संवाद मिळाव्यास संबोधित करत असताना युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे अशा सूचना केल्या. त्यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण हे उपस्थित होते.

महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमुळे महिला स्वालंबी बनणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 17 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा अधिक महिलांना लाभ व्हावा, यासाठी युवकांनी लाडकी बहीण योजना सह अन्य योजना चा लाभ होण्यासाठी लाभार्थ्यांना सहकार्य करावे.

युवकांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे काम जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवावे व पक्षाला महाराष्ट्रात एक नंबर करण्याचे काम करावे असे आव्हान केले. तसेच यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांनी देखील युवक हा पक्षाचा कणा असून त्यांनी पक्षासाठी जनसामान्यात जाऊन महायुती सरकारने घेतलेल्या अनेक महत्त्वकांक्षी निर्णय पोहोचवावे असे आव्हान त्यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहम्मद खान पठाण होते.

DSC02854 Youth should do party work vigorously - Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे - मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जीवन पाटील घोगरे, ज्येष्ठ नेते विश्वराव भोसीकर, सरचीटणीस वसंत सुगावे, सरचिटणीस रणजीत नरोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक मेळाव्याचे आयोजक मोहसीन खान पठाण, संभाजी मुकनर, अतुल हिंगमिरे, जिल्हाध्यक्ष फेरोज पटेल ,माधव पाटील चिंचोले, कन्हैया कदम, सचिन जाधव, स्वप्नील इंगळे, मराठवाडा अध्यक्ष अंकिता विधाते, सुनंदा जोगदंड, सुरेखा पाटील, एकनाथ वाघमारे, मनोहर भोसीकर, शिवचंद्र डांगे, प्रसाद पवार, आनंद सिंधीकर, छत्रू महाराज, योगेश भरकड, हनुमंत नटूरे, राहुल चौदंते, गणेश ठेबरे, भिमराव देशमुख, अफसर पठाण, निलम यादव, रमेश गांजापुरकर, संतोष खडके, चेतन पाटील, मिलींद कावलगावकर, बाबुराव कदम, अब्दुल अतीक, शेख समीर, जुमान चाऊस यांच्यासह आदी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते युवा संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments