Wednesday, May 13

समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

नांदेड| येथील नवा मोंढा भागातील प्रतिथयश उद्योजक तथा वेंकटेश्वरा अग्रो एजन्सी चे संचालक व समाजसेवक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता बिगारी कामगारांच्या मुलांना हिंगोली नाका येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा येथे मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व फळ तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

त्यानंतर सुमन बालग्रह येथे त्यांचा वाढदिवस अनाथ मुलींसमवेत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी श्री सचिन कासलीवाल यांनी येथील मुलींना पालकाची कमी भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. पुढे बोलतांना त्यांनी या सर्व अनाथ मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली व लागलीच त्यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींसाठी उपयुक्त औषधी तसेच फळे व शालेय साहित्य संस्थेच्या संचालक श्री व सौ दिनकर यांना स्वाधीन केले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कै. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे फळवाटप आणि त्याचबरोबर श्याम नगर येथील स्त्री रुग्णालयात ही रुग्णांना व नातेवाईकांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

1181e46f afdb 412a 8c37 ee709b8e44c8 समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा - NNL

श्री सचिन कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रवीण पोकर्णा, कॉम्रेड गंगाधर गायकवाड , किसान जन आंदोलनाचे समन्वयक अजित पाटील, दैनिक दिव्य केसरीचे संपादक सुरज कौऊटकर, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गोविंद पाटील, किसान जन आंदोलनाचे समन्वयक भारत सूर्यवंशी, नकुल चव्हाण,विजय तळणकर, शुभम पांचाळ ,शिवा हंबर्डे ,गोपाळ राठोड ,मंगेश तेलंग, अशोक बोकेफोड, कैलास जाधव,जीवन सोनकांबळे,दत्ता सांगवे, विश्वनाथ पाटील, उमेश तिवारी,बाळू ठाकूर, राजू कदम यांच्यासह सचिन कासलीवाल यांचे पारिवारीक मित्र विशाल खिवांसरा, आशिष कासलीवाल, केदार सारडा, महेश खटोड, पारस पोकर्णा, महेश चक्रवार, विवेक धूत,संदीप कासलीवाल आणि मारोती सवंडकर यासह विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!