नांदेडक्राईम

Fake notes are coming in the market : हिमायतनगरातील व्यापाऱ्यांनो सावधान..? बाजारपेठेत येताहेत बनावट नोटा – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून २०० आणि ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात येत असल्याची ओरड होते आहे. याचा फटका शहरातील काही व्यापाऱ्यांना बसला आहे. इतर व्यापाऱ्यांनी तरी सतर्क होऊन खरेदी विक्रीचा व्यवहार करताना नोटा तपासून घेणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.

गेल्या दोन वर्षांनंतर पुन्हा हिमायतनगर बाजारपेठेत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात बनावट नोटा चालविल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. हिमायतनगर पोलिसांनी मागील काळात पोटा बु. येथे एका दुकानात नोटा चलनात आणताना हा प्रकार उघड झाला होता. त्याच्याकडून पोलिसांनी २०० आणि ५०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त करून कार्यवाही केली होती. आता पुन्हा हिमायतनगर बाजारपेठेत बनावट नोटा चलनात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर बनावट नोटांचे छायाचित्र फिरत असल्याने बनावट नोटांचा रॆकेट तर येथे सक्रिय झालं नाही ना..? अशी शंका व्यापारी व जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.

याबाबतीत जाणकार सांगत आहेत कि, अनेकदा अजाणतेपणाने आपणही या बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो. कारण, एकतर आपण वेळेअभावी नोट निरखून बघत नाही. आणि अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे सहजतेने या बनावट नोटा चलनात येत असतात. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बनावट नोट म्हणजे काय..? इथपासून ते ती कशी ओळखायची याविषयीची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे.

शहरात आता सण उत्सव त्यात विशेषतः नागपंचमीचा सण म्हणजे जुगार खेळण्याचा सण म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे या खेळात देखील ब39नावट नोटा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हि बाब लक्षात घेता पोलिसांनी बनावट नोटांच्या बाबतीत सतर्क होऊन बनावट नोटांचे चलन बाजारपेठेत वाढणार नाही या दिशेने लक्ष देण्याची मागणी केली जागरूक नागरीकातून केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button