मुंबई| मेल नर्सेस बचाव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. याआधी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदने सादर करण्यात आली, तसेच सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना निवेदने देऊन न्यायाची मागणी केली गेली. अधिवेशनातही भेटीगाठी घेऊन आवाज उठवण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, आमदार डॉ तुषार राठोड, मा.सत्यजित दादा तांबे, रविकांत दादा तुपकर साहेब इत्यादीनी पत्र लिहून विरोध दर्शविला.


वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, आयुक्त, सचिव आणि खुद्द मंत्री यांना चार ते पाच वेळा थेट भेटून चर्चा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, हे शर्मनाक आणि दुर्दैवी आहे! आमचा अंत पाहू नका! लिंगभेदाचा अन्याय सहन केला जाणार नाही! आज डॉक्टर, टेक्निशियन, पोलिस, फार्मासिस्ट या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी आहे – मग नर्सिंग क्षेत्रातच मेल नर्सेसना फक्त 20% आरक्षण का?


भारतीय संविधानाचा स्पष्ट भंग!
अनुच्छेद 14: कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक
अनुच्छेद 15: लिंग, जात, धर्म यांच्या आधारावर भेदभावास मनाई
अनुच्छेद 16: सरकारी नोकऱ्यांत समान संधीचा अधिकार
10 जून 2025 रोजी काढण्यात आलेल्या RR मध्ये लिंगभेद कायम ठेवणारा निर्णय घेतला गेला, जो संविधानाच्या मूळ तत्त्वांचाच अपमान आहे. हा निर्णय फक्त अन्यायकारक नाही, तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे!


स्त्रिया सुद्धा लढ्याच्या पुढे!
अनेक महिला नर्सेस, माता-भगिनी स्वतः पुढे येत आहेत – “आमचेच पती, भाऊ, मुलं नर्सिंग क्षेत्रात आहेत, मग त्यांच्यावर असा अन्याय का? आम्ही या लिंगभेदाला विरोध करतो!” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जर राज्य सरकारने 80:20 लिंगभेदी नियम तात्काळ रद्द केला नाही, तर महाराष्ट्रभरातील मेल नर्सेस, नर्सिंग विद्यार्थी आणि न्यायप्रेमी नागरिक एकत्र येऊन आक्रमक निदर्शनं करतील, असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील सर्व मेल नर्सेस, नर्सिंग विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य , नर्सेस,संस्थाचालक — एक दिवसासाठी लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा!हा लढा फक्त मेल नर्सेसचा नाही, हा लढा संविधानाच्या संरक्षणासाठी आहे. आदी बनसोडे, डेव्हिड लोखंडे, अजय मराठे, रुषिकेश गांगर्डे, राजाभाऊ राठोड, अविनाश ब्राह्मणे, भक्तराम फड, सुकेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, अनिल जायभाये, गोपाल पवार, सम्यक जमदाडे, शंकर नाईकनवरे ,अभिषेक सुर्यवंशी, अमोल कुलथे, भुषण पाटील,लोकेश पावडे, महेश मिसाळ,ओम दांडगे, प्रथमेश परदेशी, प्रतिक पवार, सलमान घनघार, संगर्षित निमसकर, ज्ञानेश्वर काथकाडे, शिवाजी जावळे, अजय श्रीरसागर व इतर सर्व जिल्ह्यांतील समीतीचे पदाधिकार्यांनी सांगितले..!


