नांदेड, अनिल मादसवार| राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील जानकीनगर हनुमानगड भागात राजमाता जिजाऊ सृष्टीचा लोकार्पण सोहळा रविवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पार पडला. यावेळी अभ्यासिका व अंतर्गत परिसर विकास आदी पुढील कामांसाठी निधींची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली होती याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी २४ तासात महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजने अंतर्गत आणखी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महापालिका प्रशासनास १४ ऑक्टोबर रोजी शासन आदेश प्राप्त झाले आहेत.
शहरात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत महात्मा बसवेश्वर व वसंतराव नाईक पुतळ्यांची उभारणी व सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील जानकीनगर हनुमानगड भागात राजमाता जिजाऊ सृष्टी उभारण्यात यावी असा संकल्प अविनाश कदम यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री,खा अशोकराव चव्हाण यांच्याकडे मांडला होता.यास तत्काळ मान्यता देत खा. चव्हाण यांनी जिल्ह्या व मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठका घेत यासाठी निधीचा प्रस्ताव पाठवत राजमाता जिजाऊ सृष्टी उभारणीचे काम दर्जेदार करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली या ठिकाणी जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथं चित्रांच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या दाखवण्यात आला आहे. पूर्णत्वास आलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टीचा लोकार्पण सोहळा रविवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पार पडला.यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अविनाश कदम यांनी जिजाऊ सृष्टी परिसरात तोफ, तुतारी वाजवणारे मावळे यांचे शिल्प, अभ्यासिका व परिसरातील कामांसाठी अतिरिक्त निधींची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे करीत या बाबतचे निवेदन दिले होती.
सदर निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करीत राजमाता जिजाऊ सृष्टीच्या अतिरिक्त कामांसाठी निधीची मागणी खा. चव्हाण यांनी केली यास सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्याचे मुख्यमंत्र्यानी लोकार्पण सोहळ्यात जाहीर केले यानंतर दुसऱ्याच दिवशी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजने अंतर्गत आणखी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस,पवार यांचे खा. अशोकराव चव्हाण यांनी मानले आभार
शहरातील जानकीनगर हनुमानगड भागातील राजमाता जिजाऊ सृष्टीच्या पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी दिल्याने वाचनालय ,मुलींसाठी अभ्यासिका आदी कामे आगामी काळात पूर्णत्वास येणार आहे. पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांचे माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी आभार मानले आहे.