नांदेड। तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेश येथे दि. ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत तिरुमाला तिरुपती देवस्थान (टिटीडी) तिरुमला येथे परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या करीता परकामनी सेवा आहे.
त्याकरिता दोन ते तीन महिने अगोदर श्री तिरुमला तिरुपती देवस्थान यांच्या संकेतस्थळावर परकामनी सेवेकरीता ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ज्यांची निवड झाली त्यांना संदेश द्वारे कळविण्यात येते.
त्या करिता जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत कर्मचारी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, माधव कोल्हे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, कैलास लंकलवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, अजित कोटूरवार, राजप्पा बाबशेट्टे, विनायक मोरे, लिपिक शाम सावंत, किरण कुलकर्णी, भारत हांम्पले, जिल्हा परिषदचे संदिप भंडारे, श्रीकांत माने, औषध निर्माण अधिकारी दत्तात्रेय चिद्रावार, हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड कार्यालय येथील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक शंकर दंतुलवार, पोस्ट मास्टर रविंद्र भालेराव, राज्य उत्पादन शुल्क विभाग गिरीधर भालेराव, प्रकाश भालेराव यांची निवड झाली हे सर्व जण आज सकाळी देवगिरी एक्स्प्रेसने २० कर्मचारी रवाना झाले.
त्यांना आज रेल्वे स्टेशनवर शुभेच्छा देताना आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, आरोग्य निरीक्षक व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य कर्मचारी चंद्रभान धोंडगे, गिरीश पाटील, संतोष माकु, राजु चव्हाण चैतन्य टिप्रेसवार आदी उपस्थित होते.