लोहा| विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठक व नियोजन केले जात आहे.निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आज कर्मचारी तलाठी ग्रामसेवक तसेच वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी कर्मचारी याची बैठक घेतली.आचारसंहिता अंमलबजावणी , बैठे, व्हिडिओ शूटिंग, प्रचार सभा , असा १३ पथकाना कामाचे स्वरूप तसेच कायद्याची बाजू समजावून सांगितली.काळात हलगर्जीपणा करू नये असा सक्त सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या.


लोहा तहसील कार्यालयात लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत १३ पथकाच्या प्रमुखांची तसेच कर्मचारी अधिकारी यांची बैठक पार पडली.यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार कंधार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप हाडगे (लोहा) , नायब तहसीलदार रेखा चमणार (कंधार) निवडणूक महसूल सहायक तिरुपती मुंगरे, राजेश गायंगे,समन्वयक मन्मथ थोटे ईश्वर धुळगंडे, ऑपरेटर सूर्यकांत पांचाळ,दयानंद मळगे, यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी व लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी १३ पथके तयार केली आहेत .त्यात पथक प्रमुख व कर्मचारी, पोलीस कर्मचारी याचा समावेश राहणार आहे . भरारी पथक( पाच) स्थिर पथक ३ असून ते किवळा, माळेगाव यात्रा, व सुभाषनगर या मार्गावर राहणार आहे. तसेच डेरला पाटी जवळ एक पथक असेल जे की वाहनांची तपासणी करतील , तसेच व्हिडिओ शूटिंग(चार ) व्हीव्हीटी पथक एक असे एकूण १३ पथक कार्यरत असतील.निवडणूक प्रकिया सुरळीत व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून व्यवस्थित पार पाडण्यासाठीज्यांना जी जबाबदारी दिली आहे त्याचे व्यवस्थितअंमलबजावणी करणे आवश्यक आहे हलगर्जीपणा केल्यास कार्यवाही केली जाईल असा सक्त सूचना त्यांनी केल्या.

नाकाबंदी प्रत्यक्ष नामनिर्देशन सुरू झाले त्या दिवसा पासून केली जाणार आहे. तहसीलदार परळीकर तहसीलदार गोरे यांनी मार्गदर्शक सूचना सांगितल्या.टेक्निशिअल वरपडे व नगर पालिकेचे श्री सुतारे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.गुन्हा दाखल करताना द्यावयाची फिर्याद कशी नोंदवावी याचे पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले.

डीवायएसपी डॉ जगताप याची पाहणी
कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप तसेच निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी तहसील व पंचायत समिती कार्यालयात स्ट्राँगरूमची पाहणी केली. तहसीलदार परळीकर, कंधार तहसीलदार गोरे, लोहा पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसीलदार संदीप हाडगे, लोहा तलाठी पी के जाधव उपस्थित होते.यावेळी डीवायएसपी श्रीमती जगताप यांनी माहिती जाणून घेतली.