नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून भाग्यनगर पोलीसांनी चैन हिसकावणाऱ्या चोरट्यांकडुन ०२ गुन्हे उघड करुन १ लक्ष ४८ हजार २००/ रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अनिता राजु भुसा वय ४७ वर्षे रा. त्रिवेणी नगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुले तोडत असताना अज्ञाताने जबरीने एक सोन्याचे मिनी गंठण वजन १७ ग्राम किंमती १,०४,७००/- रुपये ०२) एक गळयातील सोन्याची चैनीचा तुकडा वजन ७.४ मिलीग्राम किंमती ४३,५००/- रुपये असा मुद्देमाल चोरून नेला होता. यावरून पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे गुरन व कलम १)५४६/२०२४ कलम ३०४ (२), ३ (५) BNS २)५७९/२०२४ कलम ३०४ (२), ३ (५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी चेन स्नेचींग व घरफोडी चे गुन्हे उघड करुन जास्तीत जास्त मुद्येमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते.
त्यावरून तपास पथक प्रमुख कोंडिया केजगिर, पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ/१०९८ गजानन किडे, पोहेकों/२१५० विशाल माळवे, पोकों/५१६ हाणवता कदम पोकों/९३२ अदनान पठाण सर्व पो.स्टे. भाग्यनगर नांदेड यांना माली गुन्हे करणारे गुन्हेगार यांना शोध घेवून कारवाई करण्याचे आदेशित केले असता आरोपी नामे अमन किशोर जोगदंड वय २१ वर्षे रा. विष्णु नगर नांदेड यास हस्तांतरीत वॉरंट देवुन ताव्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली.
पोलीस स्टेशन भाग्यनगर हथित वेगवेगळ्या दोन ठिकाणी आरोपी व त्याचा साथिदार रोहन आंबादास गायकवाड (पी.के) असे दोघांनी संगनमत करून फिर्यादी आठवडी बाजार करुन घरी जात असताना त्रिवेणी नगर सार्वजनिक रोडवर वाघमारे यांचे घरासमोर व कॅनल रोड समोरचे वाजूचे गल्लीतील शिव विजय नगर, चैतन्य नगर रोड गल्लीत फुले तोडणारी महिला यांचे गळयातील सोन्याची चेनी हिसकावुन चोरुन घेवुन गेलो होतो असे सांगुन गुन्हयात हिसकावून घेवुन गेलेल्या सोन्याचे दागिने काढून दिले. त्यावरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर चे गुन्हे शोध पथकाने ०१) गुरन ५४६/२०२४ कलम ३०४(२), ३ (५) BNS ०२) गुरन ५७९/२०२४ कालम ३०४ (२), ३(५) BNS चे ०२ गुन्हे उघडकीस आणुन आरोपी अमन किशोर जोगदंड वय २३ वर्षे रा. विष्णु नगर नांदेड ह.मु. कारगोल नगर विरार जि. पालघर यांच्याकडून एकुण १,४८,२००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल वरिष्ठांनी भाग्यनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.
हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेव, नांदेड खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक साहेब, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक साहेव, नांदेड, किरितिका सी.एम. सहाव्यक पोलीस अधिक्षक साहेब, उप विभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पो.स्टे. भाग्यनगर तपास पथक कोंडिया केजगिर, पोलीस उप निरीक्षक पोहेको १०९८ गजानन किडे, पोहेकों/२१५० विशाल माळवे, पोकों/५१६ हाणवता कदम पोकों/९३२ अदनान पठाण सर्व पो.स्टे. भाग्यनगर नांदेड यांनी केली आहे.