Homeजि .प .शाळा पार्डी येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर -NNL

जि .प .शाळा पार्डी येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर -NNL

अर्धापूर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पार्थ व पवन बेतीवार ह्या  जुळ्या भावंडांच्या वाढदिवसानिमित्त कै .लक्ष्मीबाई सेवा भावी संस्था पार्डी (म )यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी शाळेतील १८८ विद्यार्थ्यांच्या दंत तपासणी करून पेस्ट ,ब्रश व माऊथ फ्रेशनर मोफत वाटप केले .या दंतरोग तपासणीसाठी डॉ .अभिलाषा बेतीवार , डॉ .किरण सुनेवार ,डॉ .प्राची पावडे यांनी विद्यार्थ्यांच्या दंतची तपासणी केली आहे .पार्थ व पवन बेतीवार ह्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दंत तपासणी करून विद्यार्थ्यांना वाढदिवस साजरा केला यावेळी आजी – आजोबा ,काका – काकू ,आई – वडील उपस्थित होते .या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारोतराव देशमुख हे होते,तर प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव भांगे तर सरपंच संघटनेचे निळकंठराव मदने,राजाबाई विद्यालयाचे प्राचार्य शरदराव देशमुख, पत्रकार नागोराव भांगे पाटील , पत्रकार युनूसमिया नदाफ ,ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव देशमुख ,नितीन लेकुळे,शेख गुलाब ,नागेश देबगुंडे, मारोती मदने, सुरेश बंडाळे,गोविंद भांगे,बाळू कड व  जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख ,सहशिक्षक योगाजी कल्याणकर ,रमेश पावडे ,मंगला सलामे उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भोसले यांनी केले तर आभार उषा नळगिरे यांनी मानले.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments