नांदेड| येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. नारायणराव मा. येवले यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे नॅशनल फेलोशिपने नुकतेच समारंभपूर्वक सन्मानीत करण्यात आले.
भारतीय दलित साहित्य अकादमीचे द्विदिवसीय ३८ वे राष्ट्रीय दलित साहित्य संमेलन ११ व १२ डिसेंबर रोजी पंचशील आश्रम दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भन्ते ज्योती बालकृष्ण, केरळा यांच्याकडून बुद्धवंदनेने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महासंमेलनामध्ये नेपाळ, भुतान, इंग्लंड, अमेरिका, मॉरिशिअस आदी विदेशातील दलितोत्थानामध्ये कार्यरत दलित साहित्यकार, पत्रकार, लेखक, समाजसेवी संस्थेने हिरीरीने भाग घेतला होता व दलित समस्यांवर विचारमंथन करण्यात आले.
याप्रसंगी दलितोत्थानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल ऍड. नारायणराव माधवराव येवले, लेबर कॉलनी नांदेड यांची निवड समिती प्रमुख महाराष्ट्र प्रदेशचे वामनराव विष्णुपूरीकर यांनी शिफारस केल्यावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप ऍवार्ड २०२२ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक सन्मानीत करण्यात आले.
व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यनारायण जटीया, माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम, ऍड. रमेशचंद्र रत्न, दिल्ली, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, हरियाणाचे माजी मंत्री एम.एल. रंगा, खासदार निरंजन बसी, जयवंतसिंघ जडेजा पंजाब, जी.आर. बनगार छत्तीसगड, जितेंद्र मणी ऑर्गनायझर, निरुपम राय नेपाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ऍड. नारायण येवले यांना नवी दिल्लीची ही फेलोशिप मिळाल्यामुळे अशोकराज कांबळे, नांदेड, डॉ. संघमित्रा बी. नरवाडे परभणी, डॉ. पौर्णिमा सावळे नांदेड, डॉ. शिवराज येवले हैद्राबाद, सौ. रश्मी येवले हैद्राबाद, दिनेश सारस्वत सिडको, निला सावळे नांदेड, डॉ. जे.एन. ढेपे, नांदेड, प्रा. गौतम दुथडे नांदेड, डॉ. अशोक धबाले नांदेड, डॉ. त्रिशला धबाले, नांदेड, आनंद ढगे नांदेड, शंकरराव तारु नांदेड, डॉ. कारभारी वाघमारे पनवेल, ऍड. बालाजी लोणे नांदेड, रणवीर सर कल्याण, आतम संभाजी, संदीप हाटकर, आनंद येवले, रवी कोकरे, जगदीप बळखंडे, मारोती हटकर, माधवराव सोनुले, संजय नवघडे, ऍड. बालाजी लोणे, भीमराव थोरात, भगवान येवले, श्री व सौ. वंदना दुथडे, सौ. बळखंडेबाई, सौ. उषाबाई नरवाडे, दादासाहेब येवले, प्रितकुमार सावळे, सोनाली थोरात, प्रविण मनवर, शालीनी मुनेश्वर, एफ.एल. मनवर, शेषराव गोडबोले, शालीनी हाटकर, सुजाता हाटकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.