अर्धापूर, निळकंठ मदने| ऊस उत्पादकांनी नियोजनबध्द पाच जातीच्या वाणापैकी एका वाणाची निवड करुन कोरड्या सरीत ऊसाची लागवड करावी,जे घटक लागतात तेच खत त्याच प्रमाणात वेळेत द्यावी, हिरवा ऊसाला उतम सरासरीचा ऊस होतो, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची ऊस उत्पादकांनी माहिती घेऊनच ऊसाची यशस्वी शेती करावी असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण कारखान्याच्या ऊस पीक परीसंवाद कार्यक्रमप्रसंगी केले.
भाऊराव चव्हाण सह.साखर कारखान्यानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुरुवारी ऊस पीक परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख उपस्थिती चेअरमन गणपतराव तिडके,जेष्ठ शास्त्रज्ञ रमेश हापसे (नगर), प्रा.कैलास दाड,शेतकरी समीतीचे अध्यक्ष व्यंकटराव कल्याणकर,बी आर कदम, लक्ष्मणराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ऊस उत्पादकांना सविस्तर माहिती देत रमेश हापसे म्हणाले कि,ऊसाची लागवड करतांना उच्च प्रतीचे बेणे असणे अत्यंत आवश्यक आहे.
ऊसाचे बेणे औषधात अर्धातास भिजवून लागवड करावी,कोरड्या सरीत ऊसाची लागवड करावी,ऊस हिरवा ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन लावावे. तिन प्रकारचे खत गरजेनुसार वेळेवर वापरावे. ऊसाची तोडणी करतांना खालून ऊसाची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडणीवेळी शेतातच मालक म्हणून थांबावे. माती परीक्षण करुन घ्यावे, याविषयी तिन तास मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व शेतकऱ्यांना डायरी व पेन संयोजकांनी दिल्यांने शेतकऱ्यांनी माहिती लिहून घेतली, दुपारच्या सत्रात हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले,या संवाद परीषेदेला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. कारखान्याने दुपारच्या जेवनाची व्यवस्था केली होती.हे शिबीर शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवाजीराव धर्माधिकारी व आभारप्रदर्शन प्रा.कैलास दाड यांनी मानले. यावेळी अशोक सावंत, संचालक मोतीराम जगताप, बळवंत इंगोले,साहेबराव राठोड, व्यंकटराव साखरे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्रवीण देशमुख,राजेश्वर शेटे,निळकंठराव मदने,गोरखनाथ राऊत, रणजितसिंह कामठेकर,शंकरराव टेकाळे,नवनाथ कपाटे,अड.सुभाष कल्याणकर, सुभाषराव कल्याणकर, राजू बारसे,गोविंद गोदरे,रमेश कपाटे,ईश्र्वर इंगोले,दंडे,अवातिरक,दिगंबर तिडके,बाबूराव कपाटे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.