Zilla Parishad Wangi School student, becomes a flying officer in the Air Force नांदेड l पासून अवघ्या बारा किलोमीटर वरती गोदावरीच्या काठावर वसलेले अवघ्या 1500 लोकवस्ती वांगी गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा अभिजीत विजयकुमार जाधव हे भारतीय हवाई दलातील वैमानिक अधिकारी या पदावर निवड झाली. याचा गावकरी व शाळेला अभिमान वाटला व गावातील गावकरी शाळेच्या वतिने विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथे फ्लाईंग ऑफिसर अभिजीत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.



या प्रसंगी अभिजीत जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, माझे प्राथमिक शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेत झाले असून पुढे मी नांदेड ,हैद्राबाद, दिल्ली येथे शिक्षण पूर्ण करुन आज हवाई दलात फालाईग अधिकारी झालो. विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावे.मी खेडयात जन्मलो,माझी परिस्थिती गरिब आहे. म्हणून निराश न होता. विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीने सतत कठोर अभ्यास करत राहिलाच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे या उक्ती प्रमाणे प्रयत्नाचे फळ हे निश्चितच मिळेल. अशी प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. व मला भारतीय हवाई दलामध्ये वैमानिक पदावर काम करून देशसेवा करण्याची संधी भेटली. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. “असे भावोद्गार काढले.


या प्रसंगी अभिजीत चे आजोबा दशरथ जाधव चेअरमन सेवा सहकारी सोसायटी तथा माजी सरपंच वांगी यांचा सत्कार करण्यात आला. वडील विजयकुमार जाधव यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी गोविंदराव जाधव तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच , नागोराव जाधव, प्रसाद जाधव ,दत्ता जाधव, दत्ता जाधव सरपंच , राहुल जाधव पोलिस पाटील ,दादाराव जाधव मा. अध्यक्ष शा.व्यवस्थापन समिती,प्रल्हाद जाधव, मुख्याध्यापक पंढरिनाथ टापरे ,गंगाधर जाधव, रतन जाधव, संजय जाधव, देवानंद जाधव ,दिगंबर जाधव ,राजेंद्र तारू, निवृत्ती तारू गजानन पांचाळ ,मधुकर जाधव, ज्ञानेश्वर जाधव ,नरहरी जाधव, बालाजी जाधव, शिक्षक अरुण वर्णे,शिक्षिका प्रियंका वाकडे,वैशाली कुलकर्णी, अंगणवाडी ताई अनिता तारू, विजया गायेंगी, चंद्रकला पांचाळ ,कल्पना खोंडे गोदावरी मावशी, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन सारंग स्वामी यांनी केले तर आभार तंत्रस्नेही शिक्षक गणपत मुंडकर कर यांनी मानले.




