नांदेड l स्विप कक्ष ८७ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दक्षिण नांदेड २०२४ “स्वीप कक्ष” तहसील कार्यालय ,नांदेड च्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम व मतदान शपथ हा उपक्रम स्विप कक्ष ,नांदेड ८७ यांचे सहाय्याने विहान काळजी व आधार केंद्र येथे आज दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाकरिता स्वीप कक्षाचे सदस्य प्रा.डॉ .घन:शाम येळणे संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, विहान प्रकल्प व्यवस्थापक श्री ऋषिकेश कोंडेकर व प्रकल्प व्यवस्थापक कल्पना कोकरे व सर्व स्टाफ यांनी सर्व क्लाईंटला आपल्या भेटीदरम्यान मतदान करण्याचे व राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन करू असे सांगितले. एकूणच राष्ट्रीय कार्यक्रमात स्वीप कक्ष ८७ तहसील कार्यालय नांदेड ,दक्षिण सहकार्याने सहभाग नोंदविण्यात आला.