नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. लातूर येथील जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. केशव विठ्ठल आलगुले यांना ‘प्रशंसणीय कार्यक्रम अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह असे आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक विज्ञान संस्थेचे स्वयंसेवक संदीप हरिभाऊ कळासरे यांना ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत मुंबई येथील कक्ष मंत्रालयामधून राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने विद्यापीठास मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रशंसणीय कार्यक्रम अधिकारी व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक यांचे अभिनंदन केले.
त्यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी.एम. खंदारे, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनीही त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.