हिमायतनगर। तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत आहेत, याबाबत 28 तारखेला निवेदन देऊन त्यांना मुख्यलयी राहणे बंधनकारक करा अशी मागणी केली होती, मात्र अजूनही त्यांच्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यांमुळे आज पुन्हा प्रहार च्या वतीने निवेदन देण्यात आले असून, दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, हिमायतनगर येथे वराह पुजन करून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी यांच्याकडे पडत असते. मात्र संबंधित नौकरदार त्यांना नेमुण दिलेल्या ठीकाणी न राहता शासनाचे जावई असल्यागत वागत आहेत. त्यांच्या मनमानीमुळे अनेक समस्यांना तोड दयावे लागत आहे. त्यां अधिकारी कर्मचारी याच्या भेटी अभावी अनेकांची कामे तशीच खोळंबून आहेत, तर कांही विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा रखडले त्यामुळे ग्रामीण भागातील कांही विद्यार्थ्यांना शिक्षणांपासून वंचित राहावे लागले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, व पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी अधिकारी आपल्या सोयीनुसार रेल्वेच्या वेळापत्रकानुसार भोकर नांदेड, हिंगोली व त्यांच्या सोयीनुसार ये जा करत आहेत, तसेच स्थानिक नौकरीच्या ठिकाणी राहून घरभाडे भत्ता देखील उचलून घेत आहेत. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा अपडाउंचा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयाच्या वतीने योग्य ती दखल घेवुन संबंधित ताना मुख्यलयी राहणे बंधनकारक करावे, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने योग्य ते आदोलन करण्यांत येईल असे निवेदन दिनांक 28.08.2024 रोजी दिले होते, मात्र यात कोणतीही सुधारणा झाली नाही.
त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना, शेतकऱ्याना, शेतमजुरांना व विद्याथ्यांना अत्यंत गैरसोयींना तोंड दयावे लागत आहे, तरी वरील सर्व कर्मचारी, अधिकारी हे मुख्यालयी राहण्यांसाठी त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती, त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे मराठवाडा मुफ्ती संग्राम दिनी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय, हिमायतनगर येथे वराह पुजन करून उपोषणास बसण्यांत येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर दत्ता पंडीतराव देशमुख यांच्यासह गजानन बचकलवाड, विजय हाटे, दत्ता आंबेपवाड, विश्वंभर कानोटे, सुरेश हाटे, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, सदर निवेदनांच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगांव, गट विकास अधिकारी, पं.स. हिमायतनगर, तालुका कृषि अधिकारी, हिमायतनगर, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर यांना देण्यात आले आहे.