नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुटखा विक्रेत्यांची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार दिनांक ८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य व्यवसायिकात खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत पो. नि. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पथकातील सहा. पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना दिनांक ०८.०९.२०२४ रोजी माहिती मिळाली की, पोलीस ठाणे इतवारा हद्दीत काही इसम सुगंधीत गुटखा विक्री करण्यासाठी ताब्यात बाळगुन आहेत. त्यावरुन त्यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देवुन, सोबतचे पोलीस अंमलदार यांचेसह साफळा रचुन, पोलीस ठाणे इतवारा हद्दीत एम. के. स्टार, डेली निड या दुकानाचे मागील टिनपत्राचे कंम्पाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत छापा मारला.


तेथे दोन इसम १. गफार खान पिता आरीफ खान वय ३४ वर्ष व्यवसाय व्यापार रा. अखबर फंग्शन हॉल, शादीखाना जवळ, देगलुर नाका, नांदेड २. मोहमद सुफीयान पिता मोहमद शब्बीर वय २२ वर्ष व्यवसाय मजुरी रा. रहेमतनगर, देगलुर नाका, नांदेड हे त्यांचे ताब्यात नायलॉनचे पांढऱ्या पोत्यामध्ये सुंगधीत गुटखा बाळगुन मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन रु. ३४,६५०/- चा अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा अन्न पदार्थ सुगंधीत गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे इतवारा येथे गु.र.नं. ३४०/२०२४ कलम १२३, २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम २६(२), २७, २३, ३० (२) (अ), ५९ (iv) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल हा कोठुन आणला याबाबत पुढील तपास चालु आहे.


सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सहा. पोलीस निरीक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार अफजल पठाण, पद्मसिंह कांबळे, प्रभाकर मलदोडे, किशन मुळे, विश्वनाथ पवार, गंगाधर घुगे, महिला पोलीस अंमलदार महेजबीन शेख यांनी पार पाडली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



