Friday, June 26

Tag: Z.P. Prof. School Nakhatewadi

School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

नांदेड, करियर
किनवट/हिमायतनगर(अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील किनवट व हिमायतनगर तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या मुळझरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नखातेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची सलग अनुपस्थिती उघड झाल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सामाजिक अंकेक्षणासाठी साधन व्यक्ती शंकर बरडे व सुरेश डवरे शाळेत पोहोचले असता शाळेला कुलूप लागलेले आढळले. ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, “गेल्या आठ दिवसांपासून शिक्षक शाळेत हजर नाहीत,” अशी धक्कादायक माहिती समोर आली. इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत एकूण १२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले; मात्र शाळा बंद असल्याने विद्यार्थी शाळेच्या परिसरातही दिसून आले नाहीत. साधन व्यक्त...
error: Content is protected !!