Yellow alert ; नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवस येलो अलर्ट ; वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता
नांदेड l प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29, 30 एप्रिल व 1, 2 मे 2025 हे चार दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 29 व 30 एप्रिल या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 1 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची व दुपारनंतर संध्याकाळी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 2 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेचा कडकडाट ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.
या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नांदेड जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाण...
