An unknown thief looted an amplifier worth 70 thousand | हिमायतनगरातील लकडोबा हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने ७० हजाराचा ऍम्प्लिफायर लंपास केला – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील गजबजलेल्या लकडोबा चौक वस्तीत असलेल्या हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने पावसाच्या सरी आणि शांततेचा फायदा घेऊन अंदाजे ७० हजार रुपये किमतीचा अहुजा कंपनीचा ऍम्प्लिफायर चोरून नेला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, चोरटा अंगावर भगवी दस्ती खांद्यावर टाकून एम्प्लिफायर घेऊन जात असल्याचे दिसत असल्याने पोलीस या दिशेने तपास सुरु केला आहे. हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडत असताना यावर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहरात पावसाची संतधर सुरु आहे, या संधीचा फायदा घेत हिमायतनगर शहर व परिसरात चोरटे सक्रिय झाले आहेत. पावसाची रिपरिप चालू असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून अज्ञात चोरटे दुकान फोडणे, घरफोडी करणे, मंदिरातून व इतर ठिकाणाहून साहित्य चोरून येणे आदि छोट्या-मोठ्या चोर...
