Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना
प्रस्तावना - आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।
श्लोकाचा अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (टीप) हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो.
भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी !- सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यान...
