वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL
नांदेड| वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोमाला कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन बांधणीचा त्याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी निमित्ताने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हा दक्षिणच्यावतीने दक्षिण विभागाच्या संपर्क कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली. तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी सूचना व चर्चा करण्यात आली.
यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांची प्रमुख ...
