Dr. Babasaheb Ambedkar ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला मेळावा आणि निबंध स्पर्धा संपन्न
नांदेड | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कविता गंगाधर सोनकांबळे, डॉ. सुचिता संजय पेकमवार (स्त्रीरोगतज्ज्ञ), सुचित्रा भगत (समुपदेशक, महिला व बाल सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), शकीला शब्बीर शेख (सदस्य, जिल्हा महिला सल्लागार समिती) यांनी महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता, सामाजिक भान आणि सशक्तीकरणाच्या विविध पैलूंवर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्य...
