Mrs. Aruna Narwade : शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहावे -सौ. अरुणा नरवाडे -NNL
नांदेड| देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे अनमोल असे योगदान आहे हे नाकारता येणार नाही पण स्पर्धेच्या काळात शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहिल्यास खऱ्या अर्थाने शिक्षक दीन साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांनी केल्या.
दीपक नगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव के.जी.नरवाडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन राऊत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीब...
