Nanded Police Action : नांदेड LCBची मोठी कारवाई : गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसेसह आरोपी जेरबंद
नांदेड | जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एका आरोपीला गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. या कारवाईत एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीकडून २ गावठी पिस्तुल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेला आरोपी हा नांदेड शहरातील रहिवासी असून, त्याच्यावर शस्त्र बाळगण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीकडून बेकायदेशीररीत्या शस्त्रसाठा बाळगल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता असून, बेकायदेशीर शस्त्रधारकांमध्ये भीतीचे वातावरण न...
