Winter Resistance Month June 2025 ; हिवताप प्रतिरोध महिना जुन 2025
नांदेड l सध्या पावसाळा सुरु होत आहे. माहे जुन महिना हा हिवताप व किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी करीता त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. या दृष्टीने समाजातील सर्व स्तरावर किटकजन्य आजाराबाबत आरोग्य शिक्षण मिळावे या करीता माहे जून 2025 हा महिना " हिवताप प्रतिरोध महिना " म्हणून साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी दिली.
" हिवताप " या आजाराबाबत थोडक्यात माहीती
" हिवताप " या आजाराचा प्रसार अॅनाफेलीस या डासांच्या मादी मार्फत होतो. निसर्ग निर्मित स्थाने भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. तसेच मानव निर्मित डासोत्पत्ती स्थाने नारळांच्या करवंट्या, टाय...
