Collector Abhijit Raut ; साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – NNL
नांदेड| संवेदनशील कवी म्हणून जशी ओळख तशी जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून दासरी यांची ओळख असून, सेवानिवृत्ती देखील त्यांनी साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे, अशा भावना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्या.
काल सायंकाळी बापू दासरी मित्रमंडळ व नातेवाईक यांच्या वतीने बापू दासरी समाज कल्याण अधिकारी यांचा निरोप समारंभ नक्षत्र हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, बापू दासरी यांनी अष्टपैलू व्यक्तीमत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. सरकारी नोकरीत कामाच्या मर्यादा असतात. मात्र आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात देखील भरीव काम करावे.
या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून सहसंचालक डी. डी. देशमुख, निवृत्त उपायुक्त दीपक वडकुते, प्रादेशिक उपा...
