Provide free Sand ; घरकुलधारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश हवेत….! जप्ती च्या नावाने सुरु असलेली वाळू कमी दरात देण्याची मागणी
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। घरकुलधारकांना मोफत वाळू मिळवून देणारा शासन आदेश आहे, व माहूर तालूक्याला वळसा घालून वाहणारी पैनगंगा नदि असून नऊ नदी घाट आहेत,त्यातील लिंबायत (चोलेवाडी) पडसा येथे जप्त केलेल्या वाळू साठ्याला १० दिवसाची वाहतुक पास देण्यात आली त्यातील वाळू कमी दरात घरकूल लाभार्थीना देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बेघर असलेल्या नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी शासनाने घरकुल योजना राबविल, मात्र वाळू अभावी घरकुल बांधकाम करताना लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. मागील एक वर्षांपासून तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेतीही मिळू शकली नाही. अगोदरच अनुदान प्रलंबित आणि त्यातच मोफत रेतीही नाही यामुळे घरकुल लाभार्थी दुहेरी अडचणीत सापडले आहेत.
दारिद्र्य रेषेखालील तसेच पक्के घर नसणारे, आर्थिकदृष्ट्या व सामाज...
