Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण
हिमायतनगर, अनिल मादसवार। विदर्भ मराठवाडा सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील सार्वजनिक विहीर व 500 फूट खोल असलेल्या बोअरवेलची पाणी पातळी खाली गेली असून, घराघरातील शेकडो विंधनविहिरी अक्षरशः बंद पडल्या आहेत. त्यातच मंजूर नळयोजनेचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तासंतास नंबर लावून बोअरवेलवर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर न सोडता तात्काळ पाण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
हिमायतनगर शहराची तहान भागविण्यासाठी 19 कोटी 19 लक्ष रुपयांची नळयोजना मंजूर झाली मात्र ही नळयोजना आजही थंडबसत्यात आहे, नळयोजनेचे काम ठेकेदार यांच्याकडून थातुरमातुर पद्धतीने केल्या गेल्याने 5 वर्षांपासून नळयोजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारले, शहरात पाईपलाईन केली मात्र अजूनही नळाला पाणी आले नसल्या...
