Victory Day : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा
नांदेड| भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. तथापि भारतीय स्वराष्ट्राच्या संकल्पनेला विसरले नाहीत. अनेक योध्दे, क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या संकल्पनेसाठी लढा दिला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. 26 जुलै हा विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.
त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 26 जुलै रोजी विजय दिन साजरा करण्यात आला. विजय दिनानिमीत्त माजी सुभेदार गोविंद शेवाळकर, लक्ष्मण विश्वास, सखाराम जोशी तसेच विरांगणा श्रीमती सरोजनी शिनगार पुतळे, श्रीमती शितल कदम य...
