क्युआर कोडव्दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्दारे पडताळणी: मुख्य कार्यकारी अधिकारी करणार कारवाई – NNL
नांदेड| ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या उपस्थितीसाठी जिल्हा परिषदेने शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी ठिकाणी क्युआर कोड लावले आहेत. परंतू काही कर्मचारी या नवीन प्रणालीचा वापर करण्यास नकार देत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉलकरुन पडताळणी करणार आहेत. दरम्यान कार्यालयाची वेळ व शिस्त न पाळणा-या व गैरहजर असणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
ग्रामीण व दुर्गम भगात कर्मचारी गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. काही वेळा अनुपस्थित राहतात अशा तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेला येत होत्या. त्या अनुषंगाने ग्राम पातळीवरील कर्मचारी गाव...
