नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL
नांदेड| १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याने नांदेड लोकसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारत काँग्रेसला विजयी केले आहे.
कधीकाळी अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कट्टर विरोधक होते. मात्र, चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने फायदा होण्याऐवजी, नांदेडची जागा भाजप पक्षाला गमवावी लागली. नांदेडकरांची सहानुभूती अशोक चव्हाणांना नव्हे, तर काँग्रेसला असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या फेरीपासून आघाडीवर राहत वसंतराव चव्हाण यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथ...
