Vaibhav Paitwar : पतंग उडवत असतांना पोलवरील विद्युत प्रवाहाला लागुन दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार
नवीन नांदेड| दहाव्या वर्गात शिक्षण घेत असताना पतंग उडवताना विघुत पोलावरील विज पुरवठा करणाऱ्या लोखंडी ताराला पतंग लटकली काढावयास गेलेल्या वैभव पईतवार यास विजेच्या धक्क्याने दोन्ही हात निकामी असलेल्या अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक महसूल अधिकारीपदी निवड झाली, निवडीचे वृत्त कळताच राज्यभर सोशिएल मिडिया व व्हाटस अप, फेसबुक माध्यमातून अभिनंदन करण्यात आल्या नंतर जळगाव येथुन 14 जुलै रोजी सिडको परिसरातील शंकरनगर भागातील निवासस्थानी आगमन होताच भव्य दिव्य सत्कार करण्यात आला,तर खासदार अजित गोपछडे यांनी निवासस्थानी येऊन सत्कार केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सिडको परिसरात वास्तव्यास असलेल्या वैभव पईतवार हा 2010 मध्ये दहावी वर्गात शिक्षण घेत असताना पतंग खेळत असताना त्याचा पतंग विघुत पोल वरील झाडेझुडपे असलेल्या तारा मध्ये अडकला परंतु त्यास विघुत पो...
