Leopard fatally attacks farmer ; वडगाव तांडा : शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. वडगाव तांडा शिवारात शनिवारी सकाळी तरुण शेतकरी उल्हास अनिल जाधव याच्यावर बिबट्याने अचानक झडप घेत प्राणघातक हल्ला केला. थरारक झटापटीच्या प्रसंगात शेतकरी आरडा ओरडा करताच जवळील जनावरे धावत आली, त्यानंतर बिबट्याने पळ काढल्याने शेतकरी बालंबाल बचावला आहे.
शनिवारी सकाळी सुमारास 11 वाजता उल्हास राठोड नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी शिवारात गेला असताना झुडपात दडी मारून बसलेल्या बिबट्याने अंगावर झेप घेतली. काही क्षण शेतकरी-बिबट्या झटापट सुरू राहिली. आरडाओरड ऐकून जनावरे तसेच काही शेतकरी धावत आले, त्यानंतर बिबट्याने माघार घेत धूम ठोकली. या धक्कादायक हल्ल्यात शेतकऱ्याचे कपडे फाटले असून, किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच इस्लापूर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी म...
