Mp. Ajit Gopchade : संघटित झाल्याशिवाय लिंगायत समाजाची प्रगती नाही – खा. अजित गोपछडे -NNL
लातूर/नांदेड| राज्यात व देशात लिंगायत समाजाची मोठी ताकद आहे.समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे.हा संपूर्ण समाज एकत्र आल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही,असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केले.
खा.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा गुरुवारी( दि.५)भक्तीस्थळ राजूर येथे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिवादन करून शुभारंभ झाला*.या सन्मान यात्रेचा २१ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे समारोप होणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ही सन्मान यात्रा आयोजित केली असल्याचे खा. अजित गोपछडे यांनी यावेळी सांगितले.वीरशैव लिंगायत समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या जवळपास दीड कोटी असून या समाजाला राजकीय क्षेत्रात वाटा मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर...
