Nitin Gadkari : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वसतिगृहाचे उद्घाटन -NNL
नांदेड| शासकीय मुलांचे वसतीगृह, काळेश्वर नगर, विष्णुपूरी नांदेड व शासकीय मुलीचे वसतीगृह दिपनगर नांदेड या दोन वसतीगृहासोबत महाराष्ट्रातील 44 वसतीगृहाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दुपारी नागपूर येथून दुरदश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते.
यावेळी महाज्योती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वन सेवेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यामध्ये प्रथमच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्...
