Kripachhatra : “कृपाछत्र ” या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाचा शुभारंभ
नांदेड| समाजातील दुर्लक्षित घटकांची निःस्वार्थ सेवा करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना गोरगरीबांचे कल्पनातीत आशीर्वाद मिळत असल्याचे भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या हस्ते भाजपा महानगर नांदेड व व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने सतत सातव्या वर्षी "कृपाछत्र " या उपक्रमा अंतर्गत 2025 छत्र्या वाटपाच्या शुभारंभ संध्या छाया वृद्धाश्रम नांदेड येथे करण्यात आला.*
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख,किसान मोर्चाचे प्रा.राम अय्यर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील,सोशल मीडियाचे राज यादव, प्रतिष्ठित नागरिक अशोक पडगीलवार, जेष्ठ समाजसेविका स्नेहलता जायस्वाल,शशिकांत क्षीरसागर,राजू अय्यर यांची प्रमुख उपस्थिती होती.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टरके पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. अमर राजूरकर यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठा...
