वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले
श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही थोड्या दिवसात सुरू होणार असतानाही वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन वाळु चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील दोन ट्रॅक्टर धारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क एक किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडण्याची घटना दि 2 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे
पैनगंगा नदी पात्रात जाण्यासाठी अनेक गाव खेड्यातून बैलगाडी चालण्या लायक रस्ते असून या रस्त्यावरून रात्री काही लालची वृत्तीचे ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांना फटका बसला तरीही अक्कल ठिकाणावर आलेली नसल्याने माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्य...
