Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली
नांदेड| नांदेड जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. तर नांदेड येथे नूतन जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून अर्जुन झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट-अ संवर्गातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या 6 जून रोजी राज्य शासनाने केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत सुधाकर आडे यांच्या निरोप समारंभ नुकताच घेण्यात आला. यावेळी नुतन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोराळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती तसेच जिल्हा नियोजन समितीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे 19 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड येथे रूजू झाले होते. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांनी कोरोना काळात आरोग्य विषयक बाबींवर ज...
