Kandhar Accident : रानडुकराच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार !कंधार – मुखेड राज्य महामार्गवरील दुर्दैवी घटना
कंधार (सचिन मोरे) रानडुकराने दिलेल्या जबर धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कंधार - मुखेड राज्य महामार्गावरील रुई (तालुका कंधार) येथील वळणावर दि ४ जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे देगलूर तालुक्यातील खानापूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी देगलूर तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी मारोती चांदू गायकवाड वय वर्ष २५ व दीपक मारोती घंटेवाड वय वर्ष २४ हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच २६ सीटी ९८९६ या दुचाकीवरून मुखेड मार्गे कंधारकडे येत असताना ते मुखेड जवळील रुई गावाजवळील वळणावर आले असता सुसाट रानडुकराने या दुचाकीस जबरदस्त धडक दिली. त्यामुळे या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा रुई येथील ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळत आहे.
याबाबतचे वृत्त कंधार पोलीस स्टेशनला कळताच कंधार पोलीस स्टेशनच...
