Theft of sand : वाळू चोरी करून नेणारा ट्रॅक्टर पकडला ; गस्तीवर असलेल्या तलाठ्यांची अर्ध्या रात्री धडक
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे साकुर कुपटी रस्त्यावरील नाल्यातून अर्ध्या रात्री विना नंबरच्या फार्मट्रेक कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये अवैध रित्या वाळू भरून विक्रीसाठी नेत असलेला ट्रॅक्टर महसूलच्या पथकातील तलाठ्यांनी पकडून माहूरच्या तहसील कार्यालयात पाच लाखाचा मुद्देमाल जमा केल्याची घटना दि 15 रोजी रात्री 11 वाजता घडली आहे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूंला तसेच माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठीक ठिकाणी नदीपात्रावर तसेच नाल्यावर वाळू चोरी होऊ नये म्हणून बैठे आणि फिरत्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी पैनगंगा नदी पात्रावर बैठ्या पथकांची नेमणूक झाल्याने अनेक वाळू तस्कर नाल्यावरून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने याआधी अनेक ठिकाणी ...
