Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| नांदेड जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या भक्कम दळणवळणाच्या पायाभूत सुविधा, कृषीवर आधारित उत्पादन क्षमता आणि प्रक्रिया उद्योगांची मोठी ताकद पाहता निर्यातीसाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेचे भान ठेवून भविष्यातील धोके ओळखावेत व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून नांदेड जिल्ह्याला निर्यातीच्या बाबतीत अग्रस्थानी न्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
निर्यात हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ घेत ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज “महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल...
